फॉलोअर

बुधवार, १६ डिसेंबर, २०२०

फेसबुक

फेसबुक हे एक असे सोसिएल मीडिया अप्लिकेशन आहे, जे कि मित्र जोडण्यासाठी किंवा मित्रांसोबत माहिती शेअर करण्यासाठी या ऍप्लिकेशन चा वापर होतो. 

    फेसबुक वापरण्यासाठी आपल्या संगणकाला किंवा मोबाईल ला इंटरनेट सुविधा असणे बंधनकारक आहे.

      ज्यावर आपण एकदा आपले खाते तयार केले की त्यानन्तर आपण फेसबुक असलेले इतर खातेदार असतात त्यांना मैत्री साठी विनंती पाठवु शकता. 


      फेसबुक हे अमेरिका येथे तयार झाले असून, 4 फेब्रुवारी 2004 ला याची स्थापना झाली आहे, याचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आहेत. मार्क झुकेरबर्ग याने महाविद्यालयात असताना वर्गमित्रासोबत हा प्रोजेक्ट केला होता. जो नन्तर फेसबुक म्हणून वापर करण्यात आला.

          सध्या फेसबुक चे करोडो वापरकर्ते असून त्याचा वापर विविध वापरासाठी होतो. जसे नवीन मित्र जोडण्यासाठी, वेगवेगळे ग्रुप बनवायसाठी, वेगवेगळी माहिती शेअर करण्यासाठी, चालु विडिओ शेअर करण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी इत्यादी.

         फेसबुक वर खाते तयार करण्यासाठी प्रथम आपणास फेसबुक च्या वेबसाईट www.facebook.com ब्राऊजर मध्ये टाकावे लागते, नन्तर त्यावर स्क्रीन आलेले फेसबुक पेज वर साइन अप बटन क्लिक करून वापर करणाऱ्याचे पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागतो. त्यांनतर आपल्याला आलेल्या इमेल वर खात्री साठी इमेल फेसबुक तर्फे पाठवतात. त्यावर क्लिक केल्या नन्तर आपले फेसबुक खाते खात्रीपूर्वक तयार होते.


      त्यांनतर आपण साइन अप करताना जो आई डी पासवर्ड दिला होता तोच लॉगिन करताना द्यावयाचा आहे आणि लॉगिन करायचे आहे. लॉगिन झाल्यानन्तर आपण मित्र शोधण्यासाठी शोध बॉक्स दिलेला असतो त्यामध्ये मित्राचे नाव टाकल्या नन्तर खाली मित्राचे नाव आणि फोटो येईल. त्यानन्तर मित्र असल्याची खात्री होताच आपण त्याला मैत्रीसाठी विनंती पाठवू शकता.

        फेसबुक वर काही प्रसिद्ध व्यक्ती जसे राजकारणी, चित्रपट क्षेत्रातील इत्यादी यांचे असंख्य मित्र असतात त्यामुळे या व्यक्तीच्या फेसबुक प्रोफाइल ला त्यांचे चाहते फॉलो करतात. 

        मोबाईल मध्ये फेसबुक वापरण्यासाठी काही ऍप्लिकेशन बनवले असून, उदा. फेसबुक लाईट, फेसबुक इत्यादी.

      सध्या करोडो लोक फेसबुक वर आहेत, याचे कारण म्हणजे फेसबुक वर असलेले मैत्रपूर्ण वातावरण, त्याबरोबर नवनवीन माहिती आणि व्हिडीओ पहायला मिळतात. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

संगणक

संगणक हे असे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे, ज्यामध्ये आपण, म्हणजे वापरणाऱ्या व्यक्तीने कच्ची माहिती इनपुट म्हणून दिली असता किंवा दिल्यानन्तर संगणक ...